घोटगेवाडी येथे आरोग्य शिबीर संपन्न ; ग्रामपंचायत व कोकण कला, शिक्षण विकास संस्था यांचे आयोजन.

48

दोडामार्ग : कोकण कला व शिक्षण विकास संस्था व ग्रामपंचायत घोटगेवाडी दोडामार्ग येथे १५ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत आरोग्य शिबीर संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर घोटगेवाडी सरपंच श्रीनिवास शेटकर, उपसरपंच सागर कर्पे, ग्रामपंचायत सदस्य श्री. पांगम, सदस्य, कोकण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत, कार्यक्रम समन्वय प्रकल्प समन्वयक हनुमंत गवस, कुणाल चव्हाण उपस्थित होते. या आरोग्य शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर म्हणून नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. विशाल पाटील, जनरल फिजिशियान डॉ. स्नेहा धर्णे, डॉ. श्रीया मठकर, लॅब टेक्निशियन दीपज्योती जाधव, आशा सेविका साक्षी कर्पे, डॉ. अजिंक्य गाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाबी तुळसकर व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक यांनी संस्थेच्या कार्याची माहिती. सरपंच श्रीनिवास शेटकर यांनी आरोग्य शिबिराला शुभेच्छा देत ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित सर्व उपक्रमाचा लाभ गावातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन या निमित्ताने उपस्थितांना केले.
या शिबिरामध्ये महिलांची आरोग्य तपासणी, महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, नेत्र तपासणी, मधुमेह व रक्तदाब तपासणी करून औषध वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत गवस यांनी केले.