तिर्लोट खाडीत मिळाला अनोळखी पुरुषाचा मृतदेह.

53
  • देवगड : तिर्लोट आंबेरी खाडीत शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अनोळखी पुरुषाचा मृतदेह मिळाला. आंबेरी पुलाच्या खाली खाडीकिनारी शुक्रवारी सकाळी ९.३० वा.सुमारास ४५ ते ५० वर्षे वयोगटाचा अनोळखी पुरूषाचा मृतदेह दिसला.याबाबत आंबेरी येथील रवद्र गणपत जुवाटकर यांनी विजयदूर्ग पोलिस स्थानकात खबर दिली असून विजयदूर्ग पोलिस स्टेशनचे स.पो.निरिक्षक हेमंत देवरे आणि पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. याबाबत आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद करण्यात आली असून अनोळखी पुरूषाचा मृतदेह असल्याने त्याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.