सावंतवाडी : येथील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या ज्ञानदीप शैक्षणिक मंडळातर्फे आज विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांचा सन्मान होणार आहे. यात अभिनव वैज (कृषी अधिकारी ),
रुपेश कांबळे ( कृषी अधिकारी), तनया वाडकर (LLB विशेष प्रविण्य), कु.आरती चिटणीस (AIR -5 In PG Medical) कु. स्वरंगी खानोलकर (R. D. Pared Delhi, NCC ) यांचा सन्मान होणार असून यावेळी ज्ञानदीप शैक्षणिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, विद्यमान अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सहसचिव विनायक गांवस, खजिनदार एस. आर. मांगले, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै, प्रसाद अरविंदेकर, प्रदीप सावंत, मुख्याध्यापक एन.पी.मानकर, प्रज्ञा मातोंडकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिरात सदर सन्मान सोहळा दुपारी २ वाजता संपन्न होणार आहे.





