सिंधुदुर्ग : एस. टी. बस चालक चक्क मोबाईलवर बातचीत करत असतानाचा बस चालकाचा व्हिडिओ कॅमेरात कैद झालाय.सदर बस मालवण येथून कोल्हापूरच्या दिशेने बस चालवत असताना चालक चक्क मोबाईलवर संभाषण करत होता हे विशेष.आश्चर्यजनक बाब म्हणजे हे संभाषण वाहकाच्या मोबाईलवर व वाहकाच्या समक्ष होत असल्याचे पाहायला मिळते या बसमध्ये लांब पल्ल्याचे देखील प्रवासी प्रवास करत होते.दर दिवसा एसटीचे मोजता न येणारे असे छोटे-मोठे अपघात होत असतात. त्यातच आरटीओ, ट्राफिक पोलीस हे नियमांचा धाक नेहमीच सर्वसामान्य वाहन चालकाना दाखवत असतात.मग अशातच शासकीय कर्मचाऱ्यांना काहीशी सूट तर दिली नाही ना..? असा प्रश्न आता सर्वसामान्य वाहनचालकांमधून उपस्थित होत आहे. अशा वाहन चालकांवर प्रशासन कारवाई करेल का हाच प्रश्न जनतेतून निर्माण होत आहे.





