‘ये तो शुरुआत है..!’ ; शाहरुखने शेअर केले ‘जवान’चे लुक्स .!

30

मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा रिव्ह्यू काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या रिव्ह्यूमध्ये शाहरुख विविध लूक्समध्ये दिसला. आता नुकताच शाहरुखनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखचे जवान चित्रपटामधील लूक्स दिसत आहेत.

शाहरुखनं त्याच्या जवान चित्रपटामधील विविध लूक्सचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘ये तो शुरुआत है. हे न्यायाचे अनेक चेहरे आहेत.’ पुढे त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, ‘ये तीर है… अभी ढाल बाक़ी है.. . ये अंत है अभी काल बाक़ी है …ये पूछता है ख़ुद से कुछ….अभी जवाब बाक़ी है…’ शाहरुखनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

शाहरुखनं शेअर केलेल्या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘पाच वेगवेगळे लूक्स  wow’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘हा चित्रपट आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणार’

कधी रिलीज होणार जवान?

जवान (Jawan) हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट  हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच  नयनतारा, विजय सेतुपती, सुनील ग्रोवर प्रियमणी, सान्या मल्होत्रा,प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य  हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

 जवान चित्रपटामधील गाण्यांना मिळतीये प्रेक्षकांची पसंती 

जवान चित्रपटामधील जिंदा बंदा आणि चलेया ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करुन या गाण्यांचे कौतुक केले.

काही दिवसांपूर्वी  सेन्सॉर बोर्डानं जवान या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले आहे. तसेच चित्रपट रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटातील काही डायलॉग्स बदलण्याची सूचना देखील सेन्सॉर बोर्डानं दिली होती.