अभिनव वैज यांचे MPSC परीक्षेत घवघवीत यश ! ; तालुका कृषी अधिकारी पदी निवड.!

936

सावंतवाडी : येथील शिक्षक भारती सिंधुदुर्गचे सहसंघटक, कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडीचे विद्यार्थी प्रिय, सेवाज्येष्ठ शिक्षक, संतोष वैज आणि ओटवणे येथील जि. प. प्राथमिक शाळा क्रमांक ३ च्या शिक्षिका स्नेहप्रभा वैज यांचा मुलगा अभिनव वैज यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2022 मधून  तालुका कृषी अधिकारी (राजपत्रित गट ब) (वरिष्ठ) कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या पदी निवड झाली आहे. अभिनव व त्याच्या आईवडील यांचे सर्व स्तरावरून हार्दिक अभिनंदन होत असून अनेक मान्यवरांनी अभिनवला पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.