कणकवली : जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत विद्यामंदिर प्रशालेच्या खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी करून यश संपादन केले आहे. या स्पर्धेमध्ये पुढील विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
१७ वर्षा खालील मुली १ – FOIL – सबुरी नानचे – प्रथम क्रमांक तर श्रृष्टी मोरये – चतुर्थ क्रमांक.
२ – EPEE – कृपा शिरकर – द्वितीय, भूमिका चेचरे – चतुर्थ
३ – SABRE – प्रज्योती जाधव – द्वितीय
मुलगे :
१ – EPEE – ऋतुराज होसुरकर – चतुर्थ
२ – SABRE – अथर्व तेली – तृतीय, प्रणव कुडाळकर – चतुर्थ
१९ वर्षा खालील मुलगे :
FOIL – ऋग्वेद पिळणकर – तृतीय .
वरील सर्व विद्यार्थ्याची कोल्हापूर विभागीय फेन्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थांना श्री. वणवे सर, श्री. पेडणेकर सर यांनी मार्गदर्शन केले. तसचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे सर, पर्यवेक्षक सौ. जाधव मॅडम, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे मॅडम, सचिव श्री. वळंजू साहेब, संस्था पदाधिकारी यांनीनी सर्व विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.





