भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या जीवाला धोका ; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिली माहिती.

50

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि उद्योजक प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. अनोळखी व्यक्तीकडून पाळत ठेवली जात असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी पत्रात केला आहे. प्रसाद लाड यांनी गायकवाड नामक व्यक्ती वेगवेगळ्या मार्गाने जीवे मारण्याच्या प्रयत्नात असल्याचं पत्रात नमूद केलं आहे.