बांदा : राज्यात कृषीप्रधान विलवडे गावाची नावलाैकिक आहे. विलवडेची वाल दिल्ली पर्यंत गेलेली आहे. आता आपली वाल नाहीतर सर्वच भाजीपाला २० की.मी.वर असलेल्या मोपा (गोवा) आंतरराष्ट्रीय विमानतळमार्फेत परदेशात जायला वेळ लागणार नाही. यासाठी एस. आर. दळवी फाऊंडेशनचे रामचंद्र उर्फ आबा दळवी यांच्यामार्गदर्शनाखाली महिलांनी छोटे छोेटे कृषी आधारीत उद्योग सुरु करा. फाऊंडेशनच्या माध्यमातून विलवडे गावाचा विकास करुन घ्या असा संदेश बांदा येथील जेष्ठ पत्रकार मंगल कामत यांनी काढले.
एस. आर. दळवी फाऊंडेशन आणि विलवडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विलवडे गावात स्वच्छता व प्लास्टिक निर्मूलन जनजागृती मोहिमेला या गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी कामत प्रमुख पाहूणे म्हणुन बोलत्या. कार्यक्रमास तिनशेहुन महिलांचा समावेश होता. त्यामुळे”स्वच्छ गाव,सुंदर गाव हरित गाव’ ही संकल्पना या गावाने एकजुटीच्या बळावर खऱ्या अर्थाने साकारली.
या मोहिमेत एस. आर. दळवी फाऊंडेशनचे संस्थापक रामचंद्र ऊर्फ आबा दळवी आणि सरपंच प्रकाश दळवी स्वतः अग्रस्थानी राहुन या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. या स्वच्छता मोहिमेत विलवडे गावातील सहाही वाड्यानी सहभाग घेतला. यात प्रथम फोैजदारवाडी, द्वितीय मळावाडी तर तृतीय वरचीवाडी यांनी पटकाविला.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणात एकूण ४० हजार रुपयांच्या पारितोषिकांची खैरात करण्यात आली. यावेळी एस आर फाउंडेशनच्यावतीने प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १००००, ७५००, ५००० रुपये तर सहभागी वाड्यांना प्रत्येकी २५०० रुपयाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच विलवडे सरपंच प्रकाश दळवी व विलास सावंत (प्रत्येक१०००) यांच्याकडून चार वाड्यांना मिळून प्रत्येकी २००० रुपयाचे पारितोषीक देण्यात आले. यावेळी एसआर फाउंडेशनचे उर्फ आबा दळवी,सरपंच प्रकाश दळवी,माजी उपसभापती कृष्णा सावंत, माजी सरपंच मोहन दळवी, विलवडे ग्रामोन्नती मंडळाचे खजिनदार चंद्रकांत दळवी, सोनू दळवी, रमेश दळवी, बुद्धभूषण हेवाळकर, प्रफुल्ल सावंत, सुप्रिया सावंत, शिक्षक मनोहर गवस, विलास सावंत, परेश धरणे, मनोज दळवी, हरिश्चंद्र दळवी,मळावाडी येथील विनायक सावंत आदी उपस्थित होते.
प्रत्येक वाडीवर कचऱ्यासह प्लास्टिक गोळा करण्यात आला.जिल्ह्याला आदर्शवत ठरणाऱ्या स्वच्छता व प्रदूषण निर्मूलनाच्या या जागरात गावातील महिला, बचत गट, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, युवक, तसेच आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कचरा व प्लास्टिक एकत्र करून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. गाव स्वच्छतेचा व प्लास्टिक निर्मूलनाचा हा मंत्र अर्थात जागर यापुढेही असाच सुरू ठेवण्याचा निर्धार विलवडेवासीयांनी केला. विलवडे गावातील या स्वच्छता व प्लास्टिक निर्मूलनासह जनजागृती मोहिमेचे जिल्हाभरातून कौतुक झाले.





