बांदा : विलवडे – बांदा इथं ४ डंपर सहीत १२ ब्रास वाळु जप्त करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार नाकाबंदी आणि कोबींग ऑपरेशनच्या दरम्यान, बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोठी कारवाई करण्यात आली.
यावेळी पोलीस शिपाई विजय जाधव, पोलीस हवालदार रामचंद्र तेली, चालक पोलीस हवालदार सुधीर बर्डे, संजय विठू हुंबे, पोलीस हवालदार विजय गोसावी हे कारवाईत सहभागी झाले होते. विनापरवाना बेकायदा वाहतूक होत असलेल्या या कारवाईत ४ डंपर चालकांवर कारवाई करण्यात आली. भादविक ३७९, ३४ नुसार गुन्हा नोंदकरण्यात आला.
या कारवाईत सुमारे ४० लाख ७२ ००० मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी केलेल्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे.





