मुंबई : राखी सावंत कधी शांत बसेल असे चित्र दिसणे हे अवघड आहे. ती सतत तिच्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते. राखीनं लग्न केलं ही तिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक गोष्ट होती. एका महिन्याच्या आतच राखीच्या लग्नावरुन वादाला सुरुवात झाल्याचे दिसून आले. तिच्या पतीनं आदिलनं आता काही वादग्रस्त गोष्टी सांगितल्या आहेत. नेहमीच बातमीमध्ये राहण्याची कला राखीला साधली आहे. कधी ती तिच्या अतरंगी फॅशनमुळे, स्टाईलमुळे चर्चेत येते तर कधी काहीही बोलून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याची कामगिरी ती प्रभावीपणे पार पाडते. काही महिन्यांपूर्वी राखीनं तिचा पती आदिल दुर्रानीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आदिलला पोलिसांनी अटकही केली होती. यावर आदिलनं राखीला जशास तसे उत्तर दिले आहे.
आदिलनं काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन राखीवर आरोप केले आहेत. राखीवर मी जे आरोप केले आहेत त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. राखीनं माझ्याशी लग्न केलं पण तिनं रितेशसोबतही संबंध ठेवल्याचे आदिलनं म्हटले आहे. तिनं माझ्याविषयी जे काही सांगितले आहे त्यात तथ्य नाही. राखी स्वताला सिंगल आहे असे सांगते. रितेशच्या लग्नाचा व्हिडिओ माझ्याकडे आहे असे आदिलनं म्हटले आहे. आदिलनं तो व्हिडिओ मीडियाला दाखवला आहे. याशिवाय त्यांच्या लग्नाचे सर्टिफिकेटही माध्यमाच्या प्रतिनिधींना दाखवले आहे. राखीनं रितेशपासून घटस्फोट घेतलेला नाही. तिनं माझ्याशी खोटं बोलून फसवलं. आणि घटस्फोट न घेताच माझ्यासोबत लग्न केलं. माझ्याकडे राखी आणि आदिलच्या त्या पाच क्लिप्स आहेत ज्यात ते दोघेही एका हॉटेलमध्ये असल्याचे दिसून येते.
मला काही करुन त्या व्यक्तीनं केलेल्या आरोपांवर उत्तर द्यायचं आहे. वेळ पडल्यास मी मोदींकडे जाऊन दाद मागेल पण राखीला धडा शिकवणारच. अशी भूमिका आदिलनं घेतली आहे. काही दिवसांपूर्वी राखी आणि रितेशचे ते फोटोही पाहिले आहेत. तेव्हापासून मला काय समजायचे ते मी समजलो. असेही आदिलनं सांगितले आहे.





