मंत्री दीपक केसरकरांनी केले नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे स्वागत..!

134

सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या किशोर तावडे यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले सहकार्य करावे, असे त्यांना आवाहन केले.

मावळत्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. आता त्या जिल्हाधिकारी म्हणून श्री. तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तावडे यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्यात काम केले आहे.