या आणि सोने, चांदी जिंका.!, जिल्हास्तरीय महिला नारळ लढवा स्पर्धा ३० रोजी मालवण येथे ; शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाचे आयोजन.

72

मालवण : येत्या ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता बंदर जेटी येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी भव्यदिव्य अशा जिल्हास्तरीय महिला नारळ लढविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नारळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने स्पर्धेतील विजेत्यांना सोन्या-चांदीचा नारळ, कॉइन, नथ यासह अन्य स्पर्धकांवर सोन्या-चांदीचा वर्षाव होणार आहे. यावर्षी स्पर्धेचे हे ९ वे वर्ष आहे. स्पर्धेतील विजेत्या महिलेला सोन्या चांदीने मढवलेला नारळ, सोन्याचा कॉईन, सोन्याची नथ तर उपविजेत्या स्पर्धकास सोन्याचे नाणे, सोन्याची नथ तसेच तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्राप्त स्पर्धकाला सोन्याची नथ तसेच अंतिम फेरीत पोहचलेल्या स्पर्धकांना चांदीची भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाणार आहे. यासह स्पर्धक व प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ कुपन ठेवण्यात आले असून विजेत्यांना चांदीच्या भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.

माजी बांधकाम सभापती यतीन खोत आणि शिल्पा खोत मित्रमंडळाच्या वतीने मागील आठ वर्षांपासून महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. महिलांना स्पर्धात्मक व्यासपीठ मिळावे, आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात आहे. दरवर्षी महिलांचा वाढत जाणारा सहभाग हेच या स्पर्धेचे यश आहे. ही स्पर्धा शिल्पा खोत मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित केली जात असली तरी महिला वर्गाने महिलांसाठी आयोजित केलेली स्पर्धा असेच या लोकप्रिय स्पर्धेचे स्वरूप आहे.

स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित विविध मान्यवर, विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी यांचा सहभाग नेहमीच राहिला आहे. सर्वांच्या सहभागातून या स्पर्धेची भव्य दिव्यता वाढत आहे. स्पर्धेसाठी महिलांना नारळ आयोजकांच्या वतीने उपलब्ध करून दिला जाणार आहे. उपांत्य फेरीत दाखल होणाऱ्या चार स्पर्धकांना पुन्हा नव्याने प्रत्येकी पाच नारळ देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या अधिक माहिती व नावनोंदणीसाठी सौ. शिल्पा खोत मोबा – ९४२२५८४६४१, सौ. प्रतिभा चव्हाण मोबा -९३०७२९४५६९, ज्योती तोडणकर मोबा -८९५६०३६३९३, तन्वी भगत मोबा – ८१०४५००८४३ यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील महिला, मुलींनी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग दर्शवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तुषार योगेश आर्टस् निर्मित झी मराठी गाव गाता गजाली फेम आर्टिस्ट महाबली हनुमान आणि सोबत १२ फूट उंच कोंबडा हे या वर्षी स्पर्धेत खास आकर्षण असणार आहे. नारळ लढवणे स्पर्धेचे खास आकर्षण असलेला विजेतेपदाचा सोन्या चांदीने मढवलेला मानाचा नारळ व सोन्याचे कॉइन, सोन्याच्या नथ तसेच अन्य बक्षिसांचे अनावरण २८ ऑगस्ट रोजी केले जाणार आहे.