सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या ज्या ज्या सेवा ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येतात त्या सर्व सेवा वेळेत आणि गुणवत्तापूर्ण मिळाल्या पाहिजेत यासाठी संबंधित खात्यांचे सर्व अधिकारी आणि ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य मिळून संयुक्तपणे आपापली जबाबदारी पार पाडूया व ग्राहकांना चांगली सेवा देवूया, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव ग्राहक संरक्षण परिषद सिंधुदुर्ग यांनी केले. जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून बदली झाल्याने त्यांच्या अनुपस्थितीत नवनिर्वाचित ग्राहक संरक्षण परिषदेची कोरोना नंतर तब्बल अडीच वर्षानी पहिली बैठक संपन्न झाली.
अशासकीय सदस्य अॅड नकुल पार्सेकर यांनी वाहतूक पोलीस, परिवहन अधिकारी तसेच भारत संचार निगमशी संबंधित अनेक समस्या मांडल्या. अशासकीय सदस्य दयानंद चौधरी, दादा पिळणकर, प्रा. सुभाष गोवेकर, श्री. कुबल, श्री. मेस्त्री, प्रा. सुरेश पाटील आदींनी आरोग्य सेवा, वीज वितरण, वजन मापे नियंत्रण विभागाशी संबंधित अडचणी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. यावेळी सर्व अशासकीय सदस्य, भारत संचार निगम, पोलीस, आरोग्य, आरटीओ अशा आठ विविध विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी, पुरवठा शाखेचे अजित तारी, लेखाधिकारी चोरलेकर आदी उपस्थित होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुकटे यांनी सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना पुढील बैठकीत सदस्यांनी मांडलेल्या विविध समस्या बाबत लवकरात लवकरात लवकर निराकरण करुन सविस्तर अहवाल आणण्यास सांगितले.
बैठकीचा समारोप अशासकीय सदस्य अॅड. नकुल पार्सेकर यांनी केला.
Home ब्रेकिंग न्यूज ग्राहकांच्या हितासाठी सर्वांनी मिळून काम करूया! – निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे.





