सावंतवाडीत रस्ता सुरक्षा जनजागृती व जनरल चेकअप कॅम्प…!

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस स्टेशन व रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या कार्यक्रमा अंतर्गत रस्ता सुरक्षा उजव्या बाजूने चालण्याची जनजागृती करण्यात आली. तसेच जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी हेल्मेटचा वापर करणे याबद्दल रोटरी क्लब कडून जनजागृती करण्यात आली.

यावेळी रोटरी क्लबतर्फे जनरल चेकअप कॅम्पचे ही आयोजन करण्यात आले होते. यासाठी सावंतवाडी आयुर्वेदिक कॉलेज यांचे सहकार्य लाभले. सुमारे 100 हुन अधिक लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी आयुर्वेदिक कॉलेजचे एन. एस. एस प्रमुख डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. जयराम मरकंड, डॉ. सचिन युरनर, डॉ.वैभव राजवण, डॉ. शिवानी सिंह, डॉ, ऋषिकेश सातपुते, डॉ. ऋतिका रासकर यांचे सहकार्य लाभले. तर कार्यक्रमाचे आयोजक रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन विनया बाड, सेक्रेटरी रो. प्रमोद भागवत, रो. सुहास सातोस्कर, रो. काशिनाथ दुभाषी यांच्या या उपक्रमाचा सर्वांना लाभ घेता आला.

या कार्यक्रमासाठी सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.फुलचंद मेंगडे, श्री नंदकिशोर काळे, उ.प. प्रा.प. सिंधुदुर्ग अधिकारी जावेद शिकळगार, विजयकुमार अकमवार, सचिन पोलाद, संजय केरकर, अभिजीत शिरगावकर, गणेश जाधव, प्रकाश गावडे, संदीप चव्हाण, रुपेश रसाळ, जगदीश राऊळ, बच्चू कन्याळकर, ट्राफिक पोलीस राजाराम राणे, सुनील नाईक, अजित सांगेलकर व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव उपस्थित होते.