३१ जानेवारीला सकाळी ९.३० ला दोडामार्गवरून पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघणार बस…!

दोडामार्ग : ”साधु संत मायबाप तिही केले कृपादान। पंढरीचे यात्रे नेले घडले चंद्रभागा स्नान॥” पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो लोक शेकडो दिंड्यांतून पंढरीच्या यात्रेला येतात. वारीची परंपरा हजार वर्षांपेक्षा जुनी आहे.

दोडामार्ग तालुक्यातील वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी दोडामार्ग ते पंढरपूर (जया एकादशी ) अशी बस सेवा उपलब्ध केलेली आहे. दोडामार्ग वरून जाणारी ही बस मंगळवार दिनांक ३१.०१.२०२३ रोजी सकाळी ९.३० ला निघणार असून गुरुवार ०२.०२.२०२३ रोजी पंढरपूरहुन दर्शन घेऊन परत दोडामार्ग येथे येणार आहे.

तिकीट दर ( प्रत्येक व्यक्ती ) ११०० रुपये असून तिकीट बुकींग चालू आहे. अधिक माहितीसाठी संदेश वरक 9421549690, निलेश गवस 9404335978, रवी सोनवलकर 9421032575 यांच्याशी संपर्क साधावा.