शासकीय रेखाकला परीक्षेत शेठ म.ग.हायस्कूल, देवगडचे सुयश…!

देवगड : शेठ म. ग. हायस्कूल, देवगडचा शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा २०२२ – २३ चा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले आहे. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत एकूण २८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी A ग्रेड – ०२, B ग्रेड – १६ , C ग्रेड – १० असे एकूण सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

A ग्रेड प्राप्त विद्यार्थ्यामध्ये कु. कांचन उल्हास कदम व तन्मय राजेंद्र कोयंडे तर B ग्रेड प्राप्त विद्यार्थी साहिल अमरापुरकर, अमेय भुजबळ, कु. आर्या कदम, कु. वैभवी कांबळे, कु. सानिका कावले, कु. सानिया किर, कु. नम्रता कोळंबकर, सोहम कोयंडे, कु. नम्रता लाड, शुभम महाजन, कु. ऋतुजा मोहिते, कु. आलिया अब्दुल रहिमान मुजावर, कु. सावरी परब, कु. खुशी पराडकर, मिथिल पेडणेकर, कु. पूर्वा शेडबाळे या सर्व विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक राजेद्र कोयंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक संजीव राऊत , पर्यवेक्षक सुनील घस्ती , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.