कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीने महाराष्ट्र शासनाने २५१५ योजनेअंतर्गत सन २०२३ / २४ मधून ग्रामीण भागातील विकासकामांसाठी ५ कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी दिलेली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या कणकवली, देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यातील ग्रामिण भागातील विकासकामांसाठी आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने ५ कोटी रूपयांचा निधी दिनांक १४ ऑगस्ट २०२३ च्या शासन आदेशानुसार ग्रामिण भागातील मूलभूत सुविधा पुरविणाऱ्या कामांसाठी मंजूर करण्याचे आदेश कार्यासन अधिकारी श्री. अभिजित तेलवेकर यांनी काढले आहेत. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या निधीमुळे ग्रामिण भागातील रखडलेल्या विकासकामांना चालाना मिळणार आहे. आमदार नितेश राणे यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामांसाठी निधी मंजूर करून आणल्यामुळे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यात येत असल्याने ग्रामस्थांकडून याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Home महाराष्ट्र कणकवली कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ५ कोटी निधी मंजूर ; आ. नितेश राणे...





