मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान हा सध्या चर्चेत आला आहे. त्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे आज त्याचा बर्थ डे आहे. त्यानिमित्तानं त्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या आठवणींना चाहत्यांनी उजाळा दिला आहे. गेल्या काही दिवसांत बॉलीवूडमधील अनेक कलाकार टॉलीवूडमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. सैफ अली खान आणि टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता ज्युनिअर एनटीआर यांचा देवरा नावाचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर असून त्यात सैफ अली खान हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ज्युनि.एनटीआरनं सैफला शुभेच्छा दिल्या आहेत. सैफ सर तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. असे एनटीआरनं म्हटले आहे. ज्युनि. एनटीआर यापूर्वी राजामौली यांच्या आरआरआर मध्ये दिसला होता.
रामचरण आणि एनटीआर हे आरआरआरमध्ये एकत्र दिसले होते. त्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीताचा ऑस्कर मिळाला होता. आता एनटीआर देवरा नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. यात त्याच्या बरोबर सैफ दिसणार आहे. देवराचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय आहे. सैफ या चित्रपटामध्ये भैराच्या भूमिकेत दिसणार आहे. देवरा ही साऊथची एक बिग बजेट फिल्म असून त्याचे दिग्दर्शन कोरटाला सिवा यांनी केले आहे.
देवरामध्ये सैफ अली शिवाय जान्हवी कपूर देखील मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. युवसुधा आर्टस आणि एनटीआर आर्टस यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ५ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.ज्युनिअर एनटीआर हा सध्या देवराच्या चित्रिकरणात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. देवराच्या मेकर्सनं सैफच्या जन्मदिनाच्या औचित्यानं नवे पोस्टर व्हायरल करण्यात आले आहे. एनटीआरनं ती पोस्ट लिहिताना भैरा हॅप्पी बर्थ डे सैफ सर….हॅशटॅग देवरा….असे लिहिले आहे. या चित्रपटामध्ये देखील सैफ अली खान एका खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.





