सहवेदना – सगुण सावंत यांचे निधन.

24

बांदा : डिंगणे – गावठणवाडी येथील सगुण अर्जुन सावंत (वय ८४) यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. डिंगणे ग्रुप ग्रामपंचायतचे ते माजी सरपंच होते. बुधवारी सकाळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे.