
सावंतवाडी : आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपाचे युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते विशाल परब उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ, फादर रॉबी, शिक्षक -पालक संघाचे सदस्य प्रा. रुपेश पाटील आदी उपस्थित होते.
युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी शाळेसाठी त्यांनी तब्बल 1 लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्याकडे सुपूर्द केली.





