सावंतवाडी : क्रिकेटचा बादशहा कपिल देव सिंधुदुर्गातील खेळाडूंसाठी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच सावंतवाडी येणार आहे, अशी गोड आणि मोठी घोषणा भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी केली आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त मिलाग्रीस प्रशालेत आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून विशाल परब बोलत होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ, फादर रॉबी, शिक्षक -पालक संघाचे सदस्य प्रा. रुपेश पाटील आदी उपस्थित होते.





