मालवण : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब मालवण आयोजित आणि डॉ.अजित लिमये आणि डॉ. लीना लिमये पुरस्कृत मालवण मधील मानाची समजली जाणारी देशभक्तीपर समरगीत समूहगान स्पर्धा स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावून ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेने लिमये हॉस्पिटल चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेमध्ये माध्यमिक गटासाठी ओझर विद्यामंदिरमधील अस्मी पारकर, लाजरी कांदळगावकर, मधुरा आयकर, तृप्ती परुळेकर, हर्षाली लाड, अमृता बागवे, स्वरा कांबळी, रिद्धी कदम आणि अवधूत पारकर हे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी या स्पर्धेमध्ये ‘दिली थेट भेट ही स्वातंत्र्याची’ या गीताचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे हे गीत ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी लिहून मंगेश कदम आणि भरत जाधव यांच्या साथीने संगीतबद्ध केले होते. संघाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी प्रवीण पारकर आणि दीपाली पारकर यांनी पार पाडली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ओझर विद्यामंदिरचे शिक्षक अभय शेर्लेकर, पांडुरंग राणे, शिवराम सावंत आणि नितीन परुळेकर उपस्थित होते. डॉ.अजित लिमये, डॉ. लीना लिमये, रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष अभय कदम, परीक्षक संजय आठले आणि श्याम तेंडोलकर, तसेच रोटरी क्लब मालवणच्या सर्व सदस्यांनी मुलांच्या हावभावाचे आणि गाण्याच्या नवनिर्मितीचे विशेष कौतुक केले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समितीचे अध्यक्ष शेखर राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब, शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे यांनी अभिनंदन केले आहे.
Home ब्रेकिंग न्यूज समरगीत समूहगान स्पर्धेमध्ये ओझर विद्यामंदिर अव्वल! ; रोटरी क्लब ऑफ मालवणचे आयोजन.





