रोहित – विराट करणार निवृत्तीची घोषणा ; २०२३ वर्ल्डकपनंतर संघात होणार मोठे बदल?

30

मुंबई : भारतीय आयसीसी वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर भारतीय संघात मोठे बदल होतात हा इतिहास आहे. 2019 च्या वर्ल्डकपनंतर महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. त्यापूर्वी 2011 च्या वर्ल्डकपनंतर भारताची जवळपास संपूर्ण टीमच बदलली. आता 2023 च्या वनडे वर्ल्डकपनंतरही भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा, विराट कोहली सारखे अनेक वरिष्ठ खेळाडू निवृत्ती घेणार का हा प्रश्न उपस्थित होतो.

शिखर धवनचे दिवस भरले?

वर्ल्डकपनंतर निवृत्ती घेणाऱ्यांच्या यादीत सर्वात पहिले नाव हे शिखर धवनचे आहे. तो यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळेले याची शक्यता देखील फार कमी आहे. तसेच त्याला एशियन गेम्ससाठीच्या संघात देखील स्थान देण्यात आलेले नाही. भारतीय संघ व्यवस्थापन आता नव्या दमाच्या खेळाडूंकडे जास्त फोकस करत असल्याने तो लवकरच निवृत्तीची घोषणा करेल असं दिसतंय.

भुवनेश्वरची पुनरागमनाची आशा मावळली?

भारतीय संघव्यवस्थापनाने वेस्ट इंडीज दौऱ्यावर मुकेश कुमारला सातत्याने संधी दिली आहे. तसेच शार्दुल ठाकूर देखील भारतीय संघाचा सदस्य आहे. अशा परिस्थितीत स्विंग मास्टर भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघात परतेल याची शाश्वती नाही. त्यामुळे 33 वर्षाचा भुवनेश्वर कुमार देखील वर्ल्डकपनंतर निवृत्ती जाहीर करू शकतो.

रोहित शर्माची कारकीर्द देखील येणार संपुष्टात?

भारतीय संघाचा कर्णधार रोहित देखील 36 वर्षाचा आहे. तो भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे. मात्र वर्ल्डकपनंतर त्याच्याही कारकिर्दीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. आधीच त्याला टी 20 मालिकेत सातत्याने विश्रांती देण्यात येत आहे. वाढत्या वयाबरोबर त्याला आपला फिटनेस कायम ठेवणे अवघड जाणार आहे त्यामुळे तो देखील वर्ल्डकपनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो.

फिट विराट कोहली देखील घेणार निवृत्ती?

विराट जरी भारतीय संघातील सर्वात फिट खेळाडू असला तरी या वर्ल्डकपनंतर तो देखील सर्व फॉरमॅटमधून नसला तरी एका फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याची दाट शक्यता आहे. तो टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन वनडे आणि कसोटीमध्ये जास्त लक्ष केंद्रित करेल असा अंदाज आहे.

रविंद्र जेडजाही कारकिर्दीबाबत घेणार मोठा निर्णय?

जागतिक क्रिकेटमधील सर्वात चांगल्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत वरचे स्थान असलेला रविंद्र जडेजा देखील आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. तो आता 34 वर्षाचा झाला असून सध्या प्राईम टचमध्ये असलेल्या जडेजाला आपले संघातील स्थान कायम राखणे सोपे नाही. वर्ल्डकपनंतर जडेजा देखील एखाद्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतो.