प्रवास दत्तमाऊलीचा सोहळा त्रै वर्षे पूर्तीचा..

56

वेंगुर्ले :  दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय नाट्य मंडळाला तीन वर्ष पूर्ण झाल्याने त्यानिमित्त संस्थेकडून गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 10 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर व आरोग्य शिबीर पार पडले.तर आज 13 ऑगस्ट रोजी एक दिवसीय दशावतार प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तसेच येत्या रविवारी दिनांक 20 ऑगस्ट रोजी विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तसेच यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण करण्यात येणार असून, धाडसी विद्यार्थ्यांचा सत्कार देखील होणारं आहे. तसेच यावेळी दत्तमाऊली दशावतार संस्थेतील ज्येष्ठ कलावंताचा महापुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच रात्री दशावतारी नाटय रसिकांसाठी संयुक्त दशावतार नाटकांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.