देवगड : भरधाव वेगाने मळई येथे सासरवडीला रिक्षेने कुटुंबीयांना घेवून जात असताना कुत्रा आडवा आल्याने ब्रेक मारल्यानंतर रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात 4 जण जखमी झाली आहेत. हा अपघात कॉलेज रोड येथे उमेश महाडिक यांच्या घरासमोर रविवारी दुपारी 1 वा. सुमारास झाला.
तारामुंबरी येथील संतोष हरिश्चंद्र केळुस्कर हे आपल्या रिक्षेने पत्नी व मुलींना घेवून मळई येथे सासरवडी भगवान बांदकर यांच्या घरी दुपारी 1 वा.सुमारास जात होते. मळई कॉलेज रोड येथे उमेश महाडिक यांच्या घरासमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने त्यांनी ब्रेक मारला यावेळी रिक्षा पलटी झाली आणि या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर मुलगी हितेश्री हिच्या दोन्ही हात व पायाला दुखापत झाली तसेच इतर दोन मुली सलोनी आणि आस्मी व पत्नी सानिका हिला किरकोळ दुखापत झाली आहे.
या अपघातात रिक्षा चालक संतोष केळुस्कर यांच्या उजव्या पायाला फॅक्चर झाले असून त्यांना उपचारा करिता कणकवली येथे नेण्यात आले आहे. इतरांवर देवगड ग्रामीण रुग्णालय मध्ये उपचार सुरू आहेत.





