कणकवली : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कोकण विभागिय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या दालणात बैठक संपन्न झाली . सदर वेळी
कास्ट्राईब संघटनेच्या वतीने अतिरिक्त सरचिटणीस सुरेश तांबे, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जाधव (ठाणे), कास्ट्राईब शिक्षक संघटना राज्यउपाध्यक्ष संदीप कदम सिंधुदुर्ग, कोकण विभाग कास्ट्राईब माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष संतोष गाढे, डॉ . बाळासाहेब चव्हाण , महासंघ कार्याध्यक्ष रत्नागिरी, कास्ट्राईब आरोग्य संघटना जिल्हाध्यक्ष संजय जाधव , एस. पी. हांगे, एस. सी. गुरव व सागर धामोडे आदी उपस्थित होते.
यावेळी कास्ट्राईब संघटनेच्या वतीने कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचा मागासवर्गीय कर्मचारी व शिक्षक यांच्या सरळसेवा भरती प्रक्रिया बाबत अनुशेष आढावा घेण्यात आला . यावेळी विभागातील सर्व जिल्हा परिषदा यांनी जाहिराती प्रसिद्ध करून रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे सांगण्यात आले . सदर वेळी
जात पडताळणी प्रमाणपत्र नसलेल्या कर्मचारी, अधिसंख्य पदावरील कर्मचारी याबाबत भूमिका व कारवाई याबाबत चर्चा करण्यात येवुन कर्मचार्यांच्या जातपडताळणी बाबत सक्त सुचना देण्यात आल्या.
कास्ट्राईब संघटनेच्या वतीने कंत्राटी कर्मचारी आणि सफाई कामगारांना किमान वेतन व अन्य लाभ मिळावे ही मागणी केली असता मा कोकण आयुक्त यांनी मा कामगार आयुक्त यांच्या सोबत चर्चा करून या बाबत ठोस निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे . शासकीय – निमशासकीय अनुकंपा तत्वावर कर्मचारी भरती चा आढावा यावेळी घेण्यात आला व कोकण विभागातील सर्व जिल्हा आस्थापना यांना सदर प्रकरणे निकाली काढण्यासाठी आदेश आयुक्त स्तरावरून काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कोकण विभागातील कर्मचार्यांच्या वेतन दिरंगाई टाळणे बाबत जिल्हा स्तरावरून zp pfms योजने द्वारे वेतन थेट शिक्षक खाती जमा करावे व शासन स्तरावरून अनुदान प्राप्त होऊनहीं पगारास विलंब होत असल्याबद्दल निवेदन देण्यात आले .तसेच 7 व्या वेतन आयोग फरकाची बिले, प्रलंबित वैद्यकीय बिले ,प्रलंबित वेतन फरकाची बिले तसेच वेतनश्रेणी फरकाची बिले, सेवानिवृत्त शिक्षक यांची बिले वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत तरि बिलांच्या ज्येष्ठतेनुसार ही बिले मिळणे अपेक्षित असल्याचे यावेळी कास्ट्राईब संघटनेच्या वतीने मांडण्यात आले . या बाबत आपल्या वतीने संबधितांना सुचना देण्यात येतील असे आयुक्त यांनी सांगितले.
निवडणुक कामी BLO कामाची सक्ती केवळ शिक्षकांना होत आहे इतर 13 प्रकारच्या केडर च्या कर्मचारी यांनाही या कामी आदेशित करण्यात जावे असे कास्ट्राईब संघटनेच्या वतीने मांडण्यात आले .तसेच ज्या कर्मचारी व शिक्षक यांचे 53 वर्षे झालेले आहे तसेच दुर्धर आजारी शिक्षक ,दिव्यांग शिक्षक व एक शिक्षकी शाळेवरील शिक्षक यांना सदर कामातुन वगळण्यात यावे ही आग्रही मागणी यावेळी करण्यात आली . *काही बाबतीत मागासवर्गिय कर्मचारी व शिक्षक यांना टार्गेट करून निलंबित करण्यात येत आहे.
ज्या मागासवर्गीय कर्मचारी यांचे निलंबन 3 महिन्यापासून अधिक काळ चालु असल्यास त्यांना सेवेत पून.स्थापित करून घेण्या बाबत* मागणी व चर्चा करण्यात आली . सदर वेळी अशा अन्याय झालेल्या निलंबित कर्मचारी यांची यादी कास्ट्राईब संघटनेने द्यावी असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले .
तसेच शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार मागासवर्गीय प्रश्नाबाबत कास्ट्राईब शिक्षक संघटनेला व कास्ट्राईब कर्मचारी महासंघास दर तीन व सहा महिन्यांनी बैठका देऊन प्रश्न निकाली काढण्यात यावेत असे लेखी आदेश यावेळी आयुक्त यांनी कोकण विभागिय प्रशासनाला दिल्या.
बैठकीसाठी कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर, विवेक गायकवाड, उपायुक्त महसूल विभाग कोकण विभाग तसेच तहसिलदार विजय व्हटकर, नायब तहसीलदार मृणाल कदम व आस्थापना विभाग अधिकारी उपस्थित होते.



