भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांची आज जयंती आहे. अंतराळ वैज्ञानिक विक्रम साराभाई यांचं भारतीय अंतराळ संशोधनात फार महत्त्वाचं योगदान आहे. ते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि उद्योगपती होते ज्यांनीच भारतात अंतराळ संशोधन सुरू केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज आपल्या देशात इस्रोसारखी जागतिक दर्जाची अंतराळ संशोधन संस्था आहे आणि आपण लवकरच चंद्रावरही पोहोचणार आहोत. साराभाई यांनी 1963 मध्ये काही शास्त्रज्ञांसोबत मिळून एक छोटं रॉकेट अवकाशात प्रक्षेपित केलं होतं.
विक्रम अंबालाल साराभाई हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते ज्यांनी अंतराळ संशोधन सुरू केले आणि भारतात अणुऊर्जा विकसित करण्यास मदत केली. 1966 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 1972 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले.





