मळेवाडमध्ये दुसरे घर फोडले ; नागरिकांध्ये भीतीचे सावट..!

938

सावंतवाडी : मळेवाड परबवाडी येथील भरत गजानन मातोंडकर यांचे बंद घर अज्ञाताने फोडले.मातोंडकर हे परगावी राग असल्याने मळेवाड येथील त्यांचे घर हे गेली बरेच दिवस बंद होते.घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने फोडून घरात प्रवेश केला.चोरट्याने देवघरातील काही वस्तू व रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.कपाटातीलसामान अत्यावस्था अवस्थेत पसरून टाकले होते.मात्र हे घर बरेच दिवस बंद असल्याने नेमकी चोरी कधी झाली हे स्पष्ट झालेले नाही.मात्र चार-पाच दिवसापूर्वी मळेवाड येथील चव्हाण यांचे बंद घर फोडले त्याच दिवशी हे घर फोडले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे.या चोरीवरून चोरट्याने बंद घरे हे आपले लक्ष केले ते दिसून येत आहे.घर मालक मुंबई येथे राहत असल्याने उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.या घरफोडीमुळे मळेवाडीतील घरफोडी सत्र सुरूच असल्याने गावात पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी उपसरपंच हेमंत मराठे यांनी केली आहे.