सावंतवाडी : तालुक्यातील मळेवाड हेदुलवाडी येथील पांडुरंग नाणोसकर आणि दिनकर धारगळकर यांच्या घरात घुसलेल्या सापाला सर्पमित्र गजा परब व प्रसाद कोरगावकर यांनी जीवदान दिले.
सध्या पावसाळा जोरदार सुरू असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रवही वाढत चालला आहे.मळेवाडी हेदुलवाडी येथील पांडुरंग नाणोसकर यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यातील अंडी खाण्यासाठी सापाने खुराड्यात आपली वस्ती केली होती.कोंबडीने घातलेली अंडी पाहण्यासाठी नाणोसकर गेले असता त्यांना त्या ठिकाणी सर्प दिसून आला.यावेळी सर्पमित्र गजा परब यांना पाचरण करून सदर सापाला पकडून त्याला सुरक्षितपणे अधिवासात सोडले.
तसेच मळेवाडी हेदुलवाडी येथील दिनकर धारगळकर यांच्या घराच्या बाहेरील हॉलमध्ये पिंप ठेवले होते त्या पिंपाच्या मागे कोपऱ्यात सर्प दिसून आला.यावेळी सर्पमित्र गजा परब आणि उल्हास कोरगावकर यांना पाचरण केले असता या दोघांनी मोठ्या शिताफीने सदर सापाला पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले.





