माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना शासनाकडून राज्यमंत्री पदाचा दर्जा..!

94

मुंबई : माजी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांना शासनाकडून राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील आदीवासी भागातील कुपोषित मुलांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी शासनाने काही दिवसांपूर्वी पावले उचलली होती. कुपोषित मुलांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली होती. या कृती दलाच्या समितीचे अध्यक्ष हे  डॉ. दीपक सावंत होते. समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक सावंत यांना मंत्री पदाचा दर्जा देण्याची बाब शासन दरबारी विचारधीन होती. दरम्यान वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार यापुढे डॉ. दीपक सावंत यांना राज्यमंत्री पद देण्याचा शासन निर्णय नुकताच सरकारने काढला आहे. या पुढे त्यांना यांना वित्त विभागाच्या अनुज्ञेय प्रमाणे शासनाच्या सर्व सोई सुविधा देण्याचे शासन निर्णयाचे आदेश सरकारकडून निर्गमित करण्यात आले आहेत.