‘सैराट’ मैत्री… सल्या अन् लंगड्याचा पावसात भन्नाट डान्स!

76

सोलापूर : सैराट हा चित्रपट आपण सर्वांनी पाहिला असेल. मराठीमध्ये सर्वांत जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणून सैराटची जगभरात ओळख आहे. जवळपास तीन ते चार महिने चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट चालू होता. तर यातील पात्र सर्वांना आपलीशी वाटत होती. या चित्रपटातील आर्ची परशा तर सर्वांनाचा माहिती असतील पण सल्या, लंगड्या, आनी हे पात्र सुद्धा आपल्या मनात घर करून गेले असतील.सैराट या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेले सल्या म्हणजेच अरबाज शेख आणि लंगड्या म्हणजेच तानाजी गलगुंडे यांची मैत्री अजूनही चांगलीच टिकून आहे. त्यांनी सैराटनंतर नागराजच्या झुंड या चित्रपटातही काम केलं आहे. तर त्यांचा आता एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, भर पावसामध्ये फिरायला गेल्यानंतर या मित्राची जोडी रस्त्यावर कवायत डान्स करताना दिसत आहे. नागीन डान्स, मोर डान्स, कोंबडी डान्स अशा अनेक प्रकारच्या विनोदी डान्सचे व्हिडिओ आपण पाहिले असतील पण लंगड्या आणि सल्याने आता नवीन डान्सचा शोध लावला आहे.त्यांच्या या कवायत डान्सने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत तीन हजार नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे.