बांदा : ईडीची कारवाई होणार या भीतीने नारायण राणे भाजपमध्ये गेले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट करण्याचे खरे काम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केले.कोकणी माणूस आणि शिवसेना हे एक अतूट नाते आहे. शिवसेना उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झपाट्याने वाढत असून भाजप ईडी व अन्य यंत्रणाची भीती दाखवून आमचे कार्यकर्ते फोडण्याचे काम चालू ठेवले आहे.भाजपने केवळ आश्वासने देऊन सत्तेत आले मात्र दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महागाईने जनता त्रस्त आहे.त्यामुळे येत्या काळात भाजपला जनताच धडा शिकवेल अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनी केली.
इन्सुली येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते शैलेश परब, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, माजी सभापती रमेश गावकर, चंद्रकांत कासार, इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, शब्बीर मणियार, विभागप्रमुख फिलिप्स रॉड्रीग्ज, उपविभागप्रमुख मंथन गवस, ग्रामपंचायत सदस्य सोनाली मेस्त्री, आरती परब, काका चराटकर, रघुवीर देऊलकर, भाई नाटेकर,भारती कासार आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित साडे तीनशे जणांना उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खत वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना शैलेश परब म्हणाले, इथले आमदार दीपक केसरकर हे अजित पवार आपल्याला निधी देत नाही असे सांगत शिवसेना सोडून गेले मात्र जेव्हा अजित पवार मंत्री झाले त्यावेळी त्यांच्या गाडी मागून धावणारे एकमेव मंत्री हे केसरकर होते आणि ती बाब आमच्या सावंतवाडी मतदारसंघाला लज्जास्पद होती. कोरोना काळात बाथरूम मध्ये म
पडल्याचे कारण देत केसरकर घरात बसून राहिले त्यावेळी येथील शिवसैनिक जीवाचे रान करून मदत कार्य करत होते केवळ भावनिक होऊन जनतेला फसवीण्याचे काम केसरकर यांनी केले आहे आगामी काळात जनता त्यांना घरी बसवणार हे दिसत असल्याने ते आता भाजपच्या आश्रयाला जाणार हे स्पष्ट झाले आहे
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, रूपेश राऊळ, रमेश गावकर, चंद्रकांत कासार यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार सचिन पालव यांनी मानले.यावेळी संतोष मेस्त्री, उल्लास गावडे, मनोहर गावकर, किरण गावडे, संदीप कोठावळे, अनिल आईर, बाळू मेस्त्री, उल्लास सावंत, विजय गावकर, रूपेश परब, सुंदर आरोसकर आदी उपस्थित होते





