सावंतवाडी : सध्या सावंतवाडी – नृसिंहवाडी एसटी बसच्या चालकाचा एसटी बस स्वच्छ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याची बातमी ‘महाराष्ट्र माझा’ने देखील प्रसारित केली होती.
बस चालक अमोल भिरवंडेकर यांची आदर्श कृती अनेकांना भावली असून लालपरीवर प्रेम करणाऱ्यांची मन जिंकायचं काम या चालकाने केलं आहे.
दरम्यान, याबाबत चालकाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे कार्य सावंतवाडी डेपोतील कर्मचाऱ्यांनी केलं आहे. श्रीमती फाले यांच्याहस्ते चालक अमोल भिरवंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी एसटी डेपोचे वरिष्ठ लिपीक रामचंद्र वाडकर, कार्यशाळा प्रमुख संदीप मोहिते, अजित कदम, नकुल कांबळी, श्री. सांगवेकर, श्री. ताटे आदी उपस्थित होते.





