बांदा : येथील आरोग्य केंद्रात एकच डॉक्टर असल्यामुळे येथे येणार्या रुग्णाची परवळ होते आहें. ह्या गंभीर बाबीकडे कोण लक्ष देणार का? असा सवाल येथील ज्येष्ठ शिक्षक अन्वर खान यांनी केला आहे.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र हे राष्ट्रीय महामार्गावरील एक महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. या ठिकाणी रोज तपासणी केली जाते. शिवाय हे आरोग्य केंद्र महामार्गवर असल्यामुळे अनेक अपघाती रुग्ण या ठिकाणी येतात. येथे दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. त्यापैकी डॉक्टर पाटील यांची शासनाच्या नियमानुसार भेडशी येथे बदली झाली आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्राचा भार एकाच डॉक्टरांवर येऊन पडला आहें. या ठिकाणी आजूबाजूला असलेल्या सुमारे दहा ते पंदरा गावातून रुग्ण येथे येतात. एकच डॉक्टर असल्यामुळे रुग्णाची लांबच लांब लाइन असते. शिवाय सध्या अनेक आजार उद्भवत आहेत. त्यामुळे या ठिकाणी त्वरित दुसऱ्या डॉक्टरांची नेमणूक करून रुग्णाची परवळ थांवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.





