गोवा – मुंबई हायवेवर भीषण अपघात…!

रायगड : आज पहाटे ०४.४५ वा गोवा मुंबई हायवेवर गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे रेपोली येथे लोटे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक MH-४३ /U/ ७११९ व मुंबईकडून गुहागर कडे जाणाऱ्या इको गाडी MH- ४८ BT ८६७३ यांच्यामध्ये अपघात झाला आहे.

अपघातामध्ये ५ पुरुष, ३ महिला आणि एका लहान मुलगी असे ९ जण मयत झाले आहेत. एक लहान मुलगा जखमी असून त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल केले आहे. मयत इसम एकमेकांचे नातेवाईक असून ते हेदवी, ता. गुहागर येथे चालले होते. हायवेवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.