कुडाळ : वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा, अवजड वाहने नेहमी डाव्या बाजूने चालवा, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करू नका, रस्त्यावरून चालताना उजव्या बाजूने व फुटपात वरून चालावे, मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन कुडाळ पोलीस ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कुडाळ शहरातील वाहनचालक व पादचारांना केले.
वाहतुकीची नियमावली व रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिकांचे वितरण करून जनजागृतीची मोहीम राबविण्यात आली रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीने निरीक्षक शंकर चिंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात वाहतुकीची नियमावली व रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिकाचे वाहन चालक व पादचाऱ्यांना वितरण करण्यात आले.
कुडाळ पोलीस ठाण्याचे वाहतूक शाखेचे श्याम भगत व अमोल बंडगर यांनी या पुस्तकांचे व माहिती पत्रकाचे वितरण केले तसेच वाहतूक नियमावली बाबत मार्गदर्शन केले नवीन वाहतूक चलन आणि नियमान बाबत माहिती दिली. लेनची शिस्त पाळा, वळण्यापूर्वी इशारा करा, दोन मोठ्या वाहनांमधून दुचाकी घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका, दुचाकी भरधाव वेगाने चालवू नका, वाहन परवाना असल्याशिवाय वाहन चालू नये. लहान मुले, स्त्रिया, वृद्ध, अपंग, अंध, यांना रस्ता ओलांडण्यास मदत करा. अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना त्वरित मदत करा. असे आवाहन या वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांना केले. कुडाळचे पोलीस पाटील अनंत कुडाळकर वकील राजू बिले रिक्षा व्यावसायिक तसेच अन्य वाहनधारक व नागरिक उपस्थित होते.





