रायगड येथील अपघातात कलंबिस्त गावची महिला जागीच ठार…!

सिंधुदुर्ग : मुंबई येथून रायगड येथे वयोवृद्ध आजीच्या वर्ष श्राद्धासाठी मुंबई येथील राहणारे एकाच कुटुंबातील नातेवाईक इको वाहनाने येत असताना गोरेगाव रायगड येथे आज सकाळी पहाटे चारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गणशेळवाडी येथील सौ अनिता संतोष सावंत वय 55 वर्ष ही जागीच ठार झाली आहे.

या अपघातात अन्य आठ जण असे नऊ जण ठार झाले आहेत. तर, अपघातात चार वर्षाचा बालक बचावला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की एकाच वाहनातील चालकासह नऊ जण ठार झालेत. तर सुदैवाने चार वर्षांचा बालक थोडक्यात बचावला आहे तो गंभीर जखमी आहे.

या अपघाताची खबर कळताच गुहागर येथून नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले आहेत. सावंतवाडी येथील कलंबिस्त येथील सौ सावंत हिचे पती संतोष सावंत व दीर अपघात स्थळी दाखल झाले असून मयत सावंत तिच्यावर अंत्यसंस्कार गावी करण्यात येणार आहेत असे सांगण्यात आले . सौ अनिता संतोष सावंत हिला पती, एक मुलगा, सासू, दिर, भावजय असा मोठा परिवार आहे . मुंबई जोगेश्वरी येथे पती व मुलगा अशी राहत होती. मनमिळावू, शांत स्वभाव होता तिच्या या अपघाती जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.