बांदा : आधुनिक युगाचे आयुर्वेद महर्षी बाळकृष्ण महाराज यांचा ४ ऑगस्ट हा जन्मदिवस ‘आंतरराष्ट्रीय जडीबुटी दिवस’ म्हणून विश्वभर साजरा करण्यात येतो. बांदा पतंजली योग समितीच्या वतीनेही विविध उपक्रमांनी हा दिवस यशस्वीपणे राबविण्यात आला.
या दिवशी बांदा पतंजली योगसमिती बांदाचा योगवर्ग सकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत संपन्न झाल्यानंतर बांदा केंद्र शाळेच्या परिसरात औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली तसेच शाळा परिसर आवाराची साफसफाई देखील करण्यात आली.





