लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर केला अत्याचार ; गुन्हा दाखल!

151

मुंबई : मुंबईतून अत्याचाराची अजून एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एका अभिनेत्रीवरच अत्याचार झाला आहे. अधिक माहिती अशी कि, एन. एम. जोशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अभिनेत्रीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी टांझानिया येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे.