सावंतवाडी : मल्टी स्किल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी २ ते ३ .३० वाजता या दरम्यान श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे ‘आम्ही अधिकारी होणारच..!’ विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व तलाठी भरती मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत भोसले भूषविणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून कीर्ती महाविद्यालय मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्राध्यापक अमेय महाजन हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी कार्यक्रमाचा सावंतवाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Home ब्रेकिंग न्यूज आम्ही अधिकारी होणारच..! ; उद्या एसपीकेत स्पर्धा परीक्षा, तलाठी भरती मार्गदर्शन कार्यशाळा.





