सावंतवाडी : कोनशी ग्रामस्थांच्या वतीने भालावल ते कोनशी या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे गणेश चतुर्थीपूर्वी तोडून घेण्यासंदर्भात, तसेच हा रस्ता पूर्ण होऊन गेली दहा वर्ष झाल्यामुळे त्याचे योग्यरित्या डागडूजी होत नसल्याने तो लवकरात लवकर जिल्हा परिषदकडे वर्ग करण्यात यावा. याबाबत जिल्हा परिषदचे उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, कोनशी उपसरपंच नाना उर्फ अर्जुन सावंत, राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस हिदायत उल्ला खान,अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, कोनशी बूथ अध्यक्ष सिद्धेश गवस, विठ्ठल गवस,दिलीप गवस, सुनील सावंत, अनिल गवस, दीपक गवस,भरत सावंत, प्रवीण सावंत, सुभाष गवस आदी ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home ब्रेकिंग न्यूज भालावल ते कोनशी रस्ता दुतर्फा गणेश चतुर्थीपूर्वी दुरुस्त करा! ; ग्रामस्थांसह राष्ट्रवादी...





