ज्येष्ठ साहित्यिक ना.धों. महानोर यांचं निधन ; साहित्य क्षेत्रावर शोककळा !

355

 जळगाव : प्रसिद्ध निसर्गकवी प्रसिद्ध कवी ना. धो. महानोर यांचे निधन. वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे सकाळी साडेआठ वाजता निधन त्यांचं निधन झालं. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार. गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने ते व्हेंटीलेटरवर होते. राजकारण आणि समाजकारणात त्यांचा मोठा वाटा होता.

ना. धों. महानोर यांचा परिचय
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर गेली ६० हून जास्त वर्षे कवितेची साधना करीत आले आहेत. मराठी काव्यविश्‍वात निसर्गकवी म्हणून महानोरांना ओळखले जाते. महानोरांचा जन्म पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. महानोर सगळ्यांत थोरले. पळसखेडला प्राथमिक शिक्षण झालं. पुढे वयाच्या दहाव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी ते ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले. शेंदुर्णीच्या शाळेतच त्यांची कवितेशी सुरुवातीला ओळख झाली. आणि त्यांना कवितेची गोडी लागली. शाळेत असताना शाळेच्या नाटकांमधून त्यांनी कामं केली.

रानात राहणारा निसर्ग कवी

मॅट्रिक झाल्यानंतर महानोर जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात आर्ट्स शाखेत दाखल झाले. परंतु घरातल्या अडचणींमुळे वर्ष पूर्ण होण्याच्या आतच शिक्षण सोडून त्यांना गावी जाणं भाग पडलं. त्यांच्या वडिलांनी स्वत:ची पाच एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली होती आणि शेतीच्या कामांसाठी वडिलांना मुलाची गरज होती. महानोरांचं शिक्षण थांबलं आणि ते शेतीत रमले. पण याच शेतीने अथवा निसर्गाने त्यांच्यातला कवीला प्रेरणा दिली. ना. धों. यांच्या अद्भुत निसर्गकवितांनी वाचक-रसिकांना वेड लावलं आहे.
ना.धों. महानोर यांच्या कविता इतक्या बोलक्या होत्या की, ते निसर्गाशी संवाद साधत आहेत आणि त्याच कागदावर उमटवत आहेत असा भास व्हायचा.