पुणे : राज्यामध्ये गेल्या ४ ते ५ दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढचे तीन ते चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. काही भांगामध्ये सध्या शेती कामांना वेग आला आहे. तर राज्याच्या काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे.
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.





