बांद्यातील वीज समस्यांबाबत उबाठा शिवसेना आक्रमक! ; अधिकाऱ्यांना घातला घेराव.

53

बांदा: इन्सुली उपकेंद्रात तांत्रिक बिघाड होऊन दोन दिवस बांदा शहरात वीज पुरवठा खंडित झाला होता. याचे पडसाद आज बांद्यात उमटले. मागच्या पाच वर्षात आजपर्यंत तीन दिवस बांद्यात वीज पुरवठा कधी खंडित झाला नव्हता. त्यात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्याचे पंचनामे करून महावितरण भरपाई देणार का? अशा वीज समस्यांचा भडीमार करत आपण बांदा शहरात वीज पुरवठा करण्यास अकार्यक्षम असल्याने आपली तात्काळ येथून बदली करून घ्या, असे सांगत शिवसेना पदाधिकारी व वीज ग्राहकांनी सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांनी घेराव घातला.
शिवसेना (ठाकरे) बांदा शहरप्रमुख साई काणेकर व ज्येष्ठ शिवसेना नेते सुशांत पांगम यांच्या नेतृत्वाखाली बांदा शहरातील असंख्य वीज ग्राहक व वासीयांनी बांदा वीज कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिवसेना अल्पसंख्याक उपतालुकाप्रमुख रियाज खान, भाऊ वाळके, ओंकार नाडकर्णी, अर्णव स्वार, बिपिन येडवे, विनायक स्वार, ज्ञानेश्वर येडवे, राजेश पावसकर, राकेश विरनोडकर, हर्षद कामत, निखिल मयेकर, रियाज खान, प्रज्योत काणेकर, रोहित काणेकर, अनिष केसरकर, उमेश येडवे, प्रथमेश गोवेकर, अनिल नाटेकर आदी असंख्य कार्यकर्ते व ग्राहक उपस्थित होते.