कणकवली नूतन तहसीलदार देशपांडे यांनी स्विकारला पदभार..!

89

कणकवली : कणकवलीचे तहसीलदार आर . जे. पवार यांची देवगड येथे बदली झाली. त्यामुळे कणकवली तहसीलदार पद रिक्त असल्याने कणकवली तहसीलदार म्हणून दीक्षांत देशपांडे यांना नियुक्ती देण्यात आली. सोमवारी श्री. देशपांडे यांनी तहसीलदार पदाचा पदभार स्विकारला. त्याबद्दल नूतन तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांचे तहसीलदार आर. जे . पवार यांनी पुच्छगुच्छ देवून स्वागत केले . तसेच कणकवली तहसील कार्यालयातील महसूल अधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने पदभार स्विकारल्याने श्री. देशपांडे यांचे महसूल उपलेखापाल संभाजी खाडे यांनी पुच्छगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी निवासी नायब तहसीलदार गौरी कट्टे , नायब तहसीलदार शिवाजी राठोड , प्रिया परब , सत्यवान माळवे , मंडल अधिकारी दिलीप पाटील , संतोष नागावकर , बापू जाधव , श्री. चौगुले , श्रीमती तांबे , व महसुल कर्मचारी , व कोतवाल उपस्थित होते.