सावंतवाडी : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन राज्य कुमार – कुमारी कबड्डी निवड चाचणी स्पर्धा आयोजनामध्ये सुमारे एक कोटीचा अपहार केल्याचा आरोप जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे केला, याला सर्वश्री जिल्हा क्रीडा अधिकारी जबाबदार असून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा 15 ऑगस्टला कोल्हापूर येथील क्रीडा उपसंचालकांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी बोलताना जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी पुढे म्हणाले, जिल्हा क्रीडा फेडरेशनने अनेक खेळाडूंवर अन्याय केला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला आहे. या संदर्भात दाद मागूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने 15 ऑगस्टला कोल्हापूर येथे उपोषण करण्यात येणार असल्याचे देखील सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांनी वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या याचिकेनुसार कबड्डी फेडरेशनची मान्यता २०१६ पासून काढून घेतलेली असल्याने सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्याची कबड्डी अधांतरी आहे. क्रिडा आयुक्त सिंधुदुर्ग यांनी देखील दोन वर्षापूर्वी कबड्डी खेळाच्या आयोजनाबाबतच्या कबड्डी फेडरेशनच्या सर्व अधिकारांवर बंदी घातलेली आहे. तसेच शिक्षणाधिकारी, माध्यमिक यांनी देखील दोन वर्षापूर्वी फेडरेशनद्वारे कोणतेही शासकिय सामने आयोजित होता नये यासाठी बंदी घातलेली आहे. तरीदेखील आजपर्यंत बेकायदेशीररित्या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी फेडरेशनद्वारा सामन्यांचे आयोजने केल जात आहेत. या बेकादेशीर आयोजनांना अर्थातच क्रिडा अधिकारी, सिंधुदुर्ग हेच जबाबदार आहेत. आजच्या तारीखला शालेय क्रिडा स्पर्धाचे आयोजन देखील अधांतरीच आहे. अशा परिस्थितीत आज देखील कबड्डी फेडरेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उजळ माथ्याने फिरत आहेत अस मत सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशननं पत्रकार परिषदेत व्यक्त केल. तर या क्रीडा अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली. अन्यथा येत्या १५ ऑगस्टला क्रिडा उपसंचालक कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष दत्तप्रसाद अरविंदेकर, उपाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर, चेअरमन अर्चना घारे-परब, विकास केरकर, महेश कांडरकर, जावेद शेख, जितेंद्र म्हापसेकर आदि उपस्थित होते.





