मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकणी पूर आल्याच्या घटना देखील घडल्या दरम्यान येत्या काही दिवसात राज्यातील जनतेला पावसापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुढील दोन दिवस कोकण घाटमाथा, विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतकेच नाही तर ऑगस्ट महिन्याचे पहिले दहा दिवस कोरडे जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील पालघर, ठाणे, घोडबंदर, नाशिक, नंदूरबार, पुणे आणि साताऱ्यातील घाट क्षेत्रात पुढचे दोन ते तीन दिवस मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर मुंबईत पावसाचा जोर काहीसा कमी असेल. तरी येत्या 24 तासांत मराठवाड्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.





