मतदारसंघात फिरल्यावर उणीवा लक्षात येतील; मंत्री केसरकर यांच्या समर्थकांना मायकल डिसोजा यांचा टोला..!

106

सावंतवाडी : राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयाचा कारभार म्हणजे ‘राजा राज्यात फिरतोय आणि प्रजा दुध भात खाते’ असे भासविल्यासारखे आहे. कार्यालयात असलेल्या लोकांकडून शिक्षण मंत्र्यांना चुकीची माहिती दिली जात असल्यामुळे मतदार संघात आरोग्याचा आणि पुस्तकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाजू मारुन नेण्यापेक्षा मतदार संघात फिरून आपण कोठे कमी पडलो, याची माहिती घ्यावी, तरच मतदार संघाच्या उणीवा त्यांना लक्षात येतील, असे प्रत्युत्तर आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदचे माजी सदस्य मायकल डिसोजा यांनी दिले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आंदोलने केल्यामुळे कबुलायतदार गावकर, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांसारखे प्रश्न सुटले. मात्र केसरकरांच्या नाकासमोर असलेल्या बसस्थानकाचा प्रश्न आजही सुटत नाही हे दुर्दैव आहे, असेही डिसोझा यांनी सांगितले. काल या ठिकाणी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपानंतर श्री. डिसोजा यांनी पत्रकार परिषद घेवून जोरदार प्रत्युत्तर दिले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, बाळू माळकर आदी उपस्थित होते.