सावंतवाडी : सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी निराधार वृद्ध व्यक्तीला जीवदान दिले. 29 जुलै सावंतवाडी विठ्ठल मंदिर मागच्या बाजूच्या जिन्याखाली गेले कित्येक दिवस सुरेश मेस्त्री वय वर्ष 65 हा निराधार व्यक्ती पूर्ण अंगाला जखमा अंगाला पूर्णपणे दुर्गंधी असलेल्या अवस्थेत आजारी पडून होता. परंतु तो आज जास्त सिरीयस झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांना याची कल्पना दिली असता सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, शेखर सुभेदार, अशोक पेडणेकर, निखिल जाधव , दुर्गेश रेगे व सामाजिक कार्यकर्ते बाबलो डिचोलकर तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यावेळी सदर निराधार वृद्ध व्यक्ती पावसामध्ये भिजत बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला होता त्याला पाणी पाजवून शुद्धीत आणलं त्यानंतर सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी त्याला स्वच्छ आंघोळ घालून खाण्यासाठी चहा बिस्कीट दिले. त्यानंतर सदर वृद्ध व्यक्ती पूर्णपणे शुद्ध आल्यावर पोलिस कर्मचारी पी.एस.आय भागवत, होमगार्ड एस व्ही भांडीये, जीपी वेंगुर्लेकर यांच्या मदतीने ॲम्बुलन्सने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता सदर वृद्ध व्यक्तीची तब्येत चांगली आहे. पोलीस सदर वृद्ध व्यक्तींच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. असं समजलं की सदर वृद्ध व्यक्तीला दोन मुलगे आहेत व दोन्ही चांगल्या नोकरीला आहे परंतु स्वतःच्या बापावर अशी वेळ का येऊ द्यावी हे दुर्दैव आहे अशी खंत सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सदर वृद्ध व्यक्ती त्यावेळीचा बारावी पास आहे असेही समजलं. उपचारानंतर सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांचा शोध घेऊन सदर वृद्ध व्यक्तीला नातेवाईकांच्या ताब्यात देणार आहे तोपर्यंत सदर वृद्ध व्यक्ती सामाजिक बांधिलकीच्या देखरेखेखाली आहे





